मनसे पारनेर धावली शेतकऱ्यांच्या मदतीला!
मनसे पारनेरचा महावितरण कंपनीला दणका!
पारनेर: १९फेब्रुवारी२०२१-
पारनेर तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने बंद केला होता.पळवे बु,खु, जातेगाव,गटेवाडी ,घानेगाव,हंगा अशी गावांची नावं आहेत. शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कापली असं कंपनीचे म्हणणे होते. संबंधित गावातील शेतकऱ्यांनी मनसेच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष श्री.अविनाश पवार यांना ही गोष्ट सांगितली व वीज पुरवठा चालू करण्यासाठी शेतकरी काहीतरी करा असं सांगू लागले. अविनाश पवार यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की उद्या एकतर तुम्हाला वीजपुरवठा चालू होईल नाहीतर महावितरण कार्यालय फुटेल.
दुसऱ्या दिवशी अविनाश पवार शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण साहेब यांना विनंती केली व शेतकरी बांधव वीजबील भरायला तयार आहोत फक्त त्यांना वेळ आणी ठराविक रक्कम टप्या टप्याने भरण्याची मुदत द्या. जर तुम्ही विज पुरवठा चालु केला नाही तर नगर पुणे रोड सुपा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले जाईल व याला जिम्मेदार महावितरण असेल हे ऐकल्यावर महावितरण साहेब यांनी लगेच तात्काळ दखल घेऊन बंद केलेला वीजपुरवठा चालु केला.
वीजपुरवठा चालू केल्यानंतर मनसेच्या अविनाश पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आल्याचं दिसून आलं.
या वेळी मनसे सुपा शहराध्यक्ष अक्षय सुरेश सुर्यवंशी , पळवे गावचे विद्यमान सरपंच गंगाराम कळमकर ,उपसरपंच मा.शिवाजी बापु पळसकर ,श्री राजाभाऊ जाधव,सुरेश कळमकर,राजु पळसकर,सागर जाधव सर, हंगा गावचे माजी सरपंच मा.रामदास भाऊ साठे , मुंगशी गावचे श्री.दळवी सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा