पोस्ट्स

पारनेरमध्ये मनसेकडून अविनाश पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज!

२२४- पारनेर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री. अविनाश पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मनसे सहकार सेना जिल्हाध्यक्ष श्री. नितिन म्हस्के, पारनेर तालुका उपाध्यक्ष श्री. सतिश म्हस्के, मनविसे सरचिटणीस श्री. प्रशांत बेलोटे, श्री. प्रथमेश ढगे, श्री.शुभम भोसले, श्री.अनिकेत भोसले, श्री.गणेश गोरडे, श्री. रवींद्र ढगे, श्री.संदीप शिंदे, श्री. बन्सी शिंदे, श्री.सत्यवान शिंदे, श्री. स्वप्निल म्हस्के, श्री. सोमनाथ सांगडे व महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते. 🚩🚩🚩🚩🚩🚩

शिवभोजन थाळी गावागावात सुरू करावी - मनसे

इमेज
  पारनेर : १६/०४/२०२१ कोरोनाचे नव्हे तर पोटाचे खळगे कसे भरावे याची गरिबांना काळजी! - अविनाश पवार              महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झाल्यामुळे महाविकासआघाडीने राज्या लाॅकडाउन चालु केल्यामुळे मोलमजुरी करणार्‍यांवर मोठे संकट आले आहे. कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष आर्थिक मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट भरणार्‍या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने चालु केलेली शिवभोजन थाळी गावागावात तात्काळ चालु करावी अशी मागणी मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे. आज काम केले तर उद्या काय खायचे अशा गोरगरीब गरजुंना कोरोनाची नव्हे तर पोट कसे भरायचा असा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे . अशा नागरिकांचा पोटाचा प्रश्न तात्काळ सोडवावा,आज शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवावर उदार होवुन आपल्यासाठी संघर्ष करत आहे अशा शासकीय आरोग्य कर्मचार्‍यांच्या परिवाराच्या लसिकरणासह काही आपत्ती निर्माण झाल्यास त्याची आर्थिक स्वरुपात संपुर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारुन त्यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी जेणे करुन त्यांच्या संघर्षात घ...

मनसे पारनेर धावली शेतकऱ्यांच्या मदतीला!

इमेज
मनसे पारनेरचा महावितरण कंपनीला दणका! पारनेर: १९फेब्रुवारी२०२१-     पारनेर तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने बंद केला होता.पळवे बु,खु, जातेगाव,गटेवाडी ,घानेगाव,हंगा अशी गावांची नावं आहेत. शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही म्हणून त्यांची वीज कापली असं कंपनीचे म्हणणे होते. संबंधित गावातील शेतकऱ्यांनी मनसेच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष श्री.अविनाश पवार यांना ही गोष्ट सांगितली व वीज पुरवठा चालू करण्यासाठी शेतकरी काहीतरी करा असं सांगू लागले. अविनाश पवार यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की उद्या एकतर तुम्हाला वीजपुरवठा चालू होईल नाहीतर महावितरण कार्यालय फुटेल.       दुसऱ्या दिवशी अविनाश पवार शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण साहेब यांना विनंती केली व शेतकरी बांधव वीजबील भरायला तयार आहोत फक्त त्यांना वेळ आणी ठराविक रक्कम टप्या टप्याने भरण्याची मुदत द्या. जर तुम्ही विज पुरवठा चालु केला नाही तर नगर पुणे रोड सुपा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  रस्ता रोको आंदोलन केले जाईल व याला जिम्मेदार महावितरण असेल हे ऐकल्यावर ...

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतवर मनसेचा झेंडा!

इमेज
श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावातील ग्रामपंचायतवर मनसेेचा झेेंडा!   पारनेर| दि. ३१/१२/२०२०:               अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावात मनसेने बिनविरोध खाते खोलत ग्रामपंचायतवर मनसेचा जिल्ह्यातील पहिला झेंडा फडकवला.श्रीगोंदा तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका प्रमुख अमोल कोहक यांनी आपल्या स्वतःच्या गावातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला झेंडा फडकवण्याचा मान मिळवला व गावातील सरपंच होण्याचाही मान मिळवला.             महाराष्ट्रातील अनेक भागातून मनसे नेते व महाराष्ट्रसैनिक त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगरकडूनही त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के यांनीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. पारनेर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब माळी(नाना) यांनीही कोहक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून गावचा विकास करायला आम्हाल...

मनसे पारनेरकडून निघोजच्या श्रद्धाचा सत्कार!

इमेज
मनसेच्या वतीने पारनेर तालुक्यातील निघोजची कृषिकन्या श्रद्धा ढवण हिचा सत्कार केला. निघोज | २८ डिसेंबर २०२०:             शिक्षणाबरोबरच आपल्या अपंग वडिलांना कामात हातभार लावणारी श्रद्धा ढवण. अकरावी बारावी पासूनच श्रद्धा दुग्धव्यवसाय सांभाळते. BSC पदवीधर श्रद्धाने पदवीचं शिक्षणही त्यांच्याच गावात म्हणजे निघोज गावात घेतलं. घरी लहान भावंडे असल्याने ती शहरात शिकण्यासाठी गेली नाही.             अहमदनगर जिल्ह्यातील पहिला दुमजली गोठा हा श्रद्धाने तयार केला. घरातील कामात हातभार लागावा म्हणून श्रद्धा पहिल्यापासून प्रयत्नशील होती. तिच्याशी गप्पा मारताना तिने दुग्धव्यवसायातील तिचे अनुभव सांगितले.              सोशल मीडियावर श्रद्धाची कामगिरी कळताच तिच्यावर विविध ठिकाणावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत तिच्या कामाचे कौतुक केले गेले. महाराष्ट्राचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.जयंत पाटील साहेबांनीही श्रद्धाचं कौतुक केलं तसेच मनसेच्या नेत्या सौ. शालिनीताई ठाकरे यांनीही ट्विट करत श्रद्धाचं कौतुक करत मह...