अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतवर मनसेचा झेंडा!
श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावातील ग्रामपंचायतवर मनसेेचा झेेंडा! पारनेर| दि. ३१/१२/२०२०: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावात मनसेने बिनविरोध खाते खोलत ग्रामपंचायतवर मनसेचा जिल्ह्यातील पहिला झेंडा फडकवला.श्रीगोंदा तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका प्रमुख अमोल कोहक यांनी आपल्या स्वतःच्या गावातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला झेंडा फडकवण्याचा मान मिळवला व गावातील सरपंच होण्याचाही मान मिळवला. महाराष्ट्रातील अनेक भागातून मनसे नेते व महाराष्ट्रसैनिक त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगरकडूनही त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के यांनीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. पारनेर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब माळी(नाना) यांनीही कोहक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून गावचा विकास करायला आम्हाल...