अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतवर मनसेचा झेंडा!

श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावातील ग्रामपंचायतवर मनसेेचा झेेंडा!  

पारनेर| दि. ३१/१२/२०२०:

              अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावात मनसेने बिनविरोध खाते खोलत ग्रामपंचायतवर मनसेचा जिल्ह्यातील पहिला झेंडा फडकवला.श्रीगोंदा तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका प्रमुख अमोल कोहक यांनी आपल्या स्वतःच्या गावातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला झेंडा फडकवण्याचा मान मिळवला व गावातील सरपंच होण्याचाही मान मिळवला.

            महाराष्ट्रातील अनेक भागातून मनसे नेते व महाराष्ट्रसैनिक त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगरकडूनही त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के यांनीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. पारनेर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब माळी(नाना) यांनीही कोहक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून गावचा विकास करायला आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही असं कोहक म्हणाले व बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

              श्री अमोल कोहक यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संपतराव दळवी, मनसे सहकार सेनेचे श्रीगोंदा तालुका प्रमुख हेमंत लोखंडे, सहकार सेनेचे पारनेर तालुका प्रमुख दिलीप जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष योगेश शेळके तसेच गावचे नवनिर्वाचित सदस्य व गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

               

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवभोजन थाळी गावागावात सुरू करावी - मनसे

पारनेरमध्ये मनसेकडून अविनाश पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज!

मनसे पारनेरकडून निघोजच्या श्रद्धाचा सत्कार!