शिवभोजन थाळी गावागावात सुरू करावी - मनसे

 


पारनेर : १६/०४/२०२१

कोरोनाचे नव्हे तर पोटाचे खळगे कसे भरावे याची गरिबांना काळजी! - अविनाश पवार


             महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झाल्यामुळे महाविकासआघाडीने राज्या लाॅकडाउन चालु केल्यामुळे मोलमजुरी करणार्‍यांवर मोठे संकट आले आहे. कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष आर्थिक मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट भरणार्‍या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने चालु केलेली शिवभोजन थाळी गावागावात तात्काळ चालु करावी अशी मागणी मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे. आज काम केले तर उद्या काय खायचे अशा गोरगरीब गरजुंना कोरोनाची नव्हे तर पोट कसे भरायचा असा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे . अशा नागरिकांचा पोटाचा प्रश्न तात्काळ सोडवावा,आज शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवावर उदार होवुन आपल्यासाठी संघर्ष करत आहे अशा शासकीय आरोग्य कर्मचार्‍यांच्या परिवाराच्या लसिकरणासह काही आपत्ती निर्माण झाल्यास त्याची आर्थिक स्वरुपात संपुर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारुन त्यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी जेणे करुन त्यांच्या संघर्षात घरच्यांना कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागेल.

            त्याचबरोबर पारनेरला आरोग्य विभागात घेण्यात येणार्‍या कंत्राटी कामगारांचे विम्यासह लसिकरण करावे व कोविड सेंटमध्ये विनामास्क वावरणार्‍यांवर कठोर गुन्हा दाखल करावा जेणे करुन कोरोना संसर्ग सर्वसामांन्यांना होणार नाही अशा विविध मांगण्याचे लिखित पत्र मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी परिस्थितीचे गांभिर्य पाहुन पारनेच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना तातडीने पाठवीले आहे.

               


         


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पारनेरमध्ये मनसेकडून अविनाश पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज!

मनसे पारनेरकडून निघोजच्या श्रद्धाचा सत्कार!