पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतवर मनसेचा झेंडा!

इमेज
श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावातील ग्रामपंचायतवर मनसेेचा झेेंडा!   पारनेर| दि. ३१/१२/२०२०:               अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ढोरजे गावात मनसेने बिनविरोध खाते खोलत ग्रामपंचायतवर मनसेचा जिल्ह्यातील पहिला झेंडा फडकवला.श्रीगोंदा तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका प्रमुख अमोल कोहक यांनी आपल्या स्वतःच्या गावातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला झेंडा फडकवण्याचा मान मिळवला व गावातील सरपंच होण्याचाही मान मिळवला.             महाराष्ट्रातील अनेक भागातून मनसे नेते व महाराष्ट्रसैनिक त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगरकडूनही त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के यांनीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. पारनेर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब माळी(नाना) यांनीही कोहक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून गावचा विकास करायला आम्हाल...

मनसे पारनेरकडून निघोजच्या श्रद्धाचा सत्कार!

इमेज
मनसेच्या वतीने पारनेर तालुक्यातील निघोजची कृषिकन्या श्रद्धा ढवण हिचा सत्कार केला. निघोज | २८ डिसेंबर २०२०:             शिक्षणाबरोबरच आपल्या अपंग वडिलांना कामात हातभार लावणारी श्रद्धा ढवण. अकरावी बारावी पासूनच श्रद्धा दुग्धव्यवसाय सांभाळते. BSC पदवीधर श्रद्धाने पदवीचं शिक्षणही त्यांच्याच गावात म्हणजे निघोज गावात घेतलं. घरी लहान भावंडे असल्याने ती शहरात शिकण्यासाठी गेली नाही.             अहमदनगर जिल्ह्यातील पहिला दुमजली गोठा हा श्रद्धाने तयार केला. घरातील कामात हातभार लागावा म्हणून श्रद्धा पहिल्यापासून प्रयत्नशील होती. तिच्याशी गप्पा मारताना तिने दुग्धव्यवसायातील तिचे अनुभव सांगितले.              सोशल मीडियावर श्रद्धाची कामगिरी कळताच तिच्यावर विविध ठिकाणावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत तिच्या कामाचे कौतुक केले गेले. महाराष्ट्राचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.जयंत पाटील साहेबांनीही श्रद्धाचं कौतुक केलं तसेच मनसेच्या नेत्या सौ. शालिनीताई ठाकरे यांनीही ट्विट करत श्रद्धाचं कौतुक करत मह...