मनसे पारनेरकडून निघोजच्या श्रद्धाचा सत्कार!

मनसेच्या वतीने पारनेर तालुक्यातील निघोजची कृषिकन्या श्रद्धा ढवण हिचा सत्कार केला.

निघोज | २८ डिसेंबर २०२०:



            शिक्षणाबरोबरच आपल्या अपंग वडिलांना कामात हातभार लावणारी श्रद्धा ढवण. अकरावी बारावी पासूनच श्रद्धा दुग्धव्यवसाय सांभाळते. BSC पदवीधर श्रद्धाने पदवीचं शिक्षणही त्यांच्याच गावात म्हणजे निघोज गावात घेतलं. घरी लहान भावंडे असल्याने ती शहरात शिकण्यासाठी गेली नाही.
            अहमदनगर जिल्ह्यातील पहिला दुमजली गोठा हा श्रद्धाने तयार केला. घरातील कामात हातभार लागावा म्हणून श्रद्धा पहिल्यापासून प्रयत्नशील होती. तिच्याशी गप्पा मारताना तिने दुग्धव्यवसायातील तिचे अनुभव सांगितले.
             सोशल मीडियावर श्रद्धाची कामगिरी कळताच तिच्यावर विविध ठिकाणावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत तिच्या कामाचे कौतुक केले गेले. महाराष्ट्राचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.जयंत पाटील साहेबांनीही श्रद्धाचं कौतुक केलं तसेच मनसेच्या नेत्या सौ. शालिनीताई ठाकरे यांनीही ट्विट करत श्रद्धाचं कौतुक करत महिला कुठल्याही क्षेत्रात माघे नाही असं म्हटलं.
            आज मनसेच्या वतीने श्रद्धाचा सत्कार करण्यात आला अन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष मा.साबळे साहेब,मनसे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के,जिल्हाउपाध्यक्ष पप्पूशेठ लामखडे,तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार,संदीप चव्हाण,रुपेश ढवण,अतुल वरखडे उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिवभोजन थाळी गावागावात सुरू करावी - मनसे

पारनेरमध्ये मनसेकडून अविनाश पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज!